Voter ID Card Apply: 15 दिवसांत थेट घरपोच मिळणार नवीन मतदार ओळखपत्र; असा करा अर्ज

3 Min Read
voter id card apply online maharashtra

Voter ID Card Apply Online Maharashtra : भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मतदार ओळखपत्र ग्राह्य धरल जात असल्याने आता प्रत्येकाकडे मतदार ओळखपत्र असण आवश्यक आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही.

भारत निवडणूक आयोगाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे आता मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर फक्त 15 दिवसांत तुमच Voter ID कार्ड थेट घरपोच मिळणार आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेची प्रत्येक अपडेट तुम्हाला SMS द्वारे कळवली जाणार आहे. ही नवीन सुविधा संपूर्ण देशभर लागू करण्यात आली असून, नव्या ईसीआयनेट (ECINet) सिस्टमच्या मदतीने ही प्रक्रिया आता अधिक जलद आणि पारदर्शक होणार आहे.

ECINet प्रणालीमुळे Voter ID कार्ड मिळण्याच्या प्रक्रियेत डिजिटल बदल

भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) नव्या ईसीआयनेट प्रणालीची अंमलबजावणी केली आहे. यामध्ये तुमचे Voter ID कार्ड तयार होण्यापासून ते भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंतचा प्रत्येक टप्पा रिअल टाईममध्ये ट्रॅक करता येणार आहे.

नवीन प्रणालीमुळे अर्ज केल्यानंतर मतदारास Voter ID कार्ड तयार झाल्याची, ते पोस्टाने पाठवल्याची आणि वितरण झाल्याची माहिती वेळोवेळी SMS द्वारे दिली जाईल. त्यामुळे यापुढे तुम्हाला तुमच्या Voter ID कार्डची वाट पाहत बसावे लागणार नाही.

घरबसल्या करा Voter ID Card साठी ऑनलाइन अर्ज

जर तुमच्याकडे अद्याप Voter ID कार्ड नसेल, तर तुम्ही घरबसल्या सहज ऑनलाइन अर्ज करू शकता, अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. NVSP Portal वर जा.
  2. मोबाइल नंबर व ईमेलद्वारे लॉगिन करा.
  3. ‘Fill Form 6’ वर क्लिक करून नाव, पत्ता व इतर माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्जाचा प्रिव्ह्यू बघा आणि तपासून अर्ज ‘Submit’ करा.

Voter ID Card अर्जाचे स्टेटस कसे ट्रॅक करायचे?

Voter ID अर्जाचे स्टेटस ट्रॅक करण्यासाठी NVSP वर लॉगिन करून ‘Track Application Status’ या पर्यायावर जा. तिथे तुमचा रेफरन्स नंबर आणि राज्याचे नाव टाकून तुमच्या अर्जाचे अपडेट चेक करा.

Voter ID कार्ड कधी येणार? मिळणार SMS अपडेट!

ज्या दिवशी Voter ID कार्ड तयार होईल त्या दिवसापासून 15 दिवसांच्या आत ते तुमच्या घरच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल. पोस्टाने Voter ID कार्ड पाठवताना तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर SMS येईल – जसे की तुमचे कार्ड तयार झाले, पोस्टाने पाठवले, डिलिव्हर झाले इ.

भारत निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही नवी सेवा संपूर्ण देशभर लागू करण्यात आली आहे आणि लवकरच ही संपूर्ण प्रक्रिया मोबाईल अ‍ॅपद्वारे देखील सुरु होणार आहे.

हेही वाचा : सौर कृषी पंप धारक शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी सुविधा; हेल्पलाईन नंबर व विशेष पोर्टल सुरु.

Share This Article