Solar Pump Yojana Maharashtra 2025 Online Apply : शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे! महाराष्ट्र शासनाने सौरचालित फवारणी पंप योजना 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, आता या योजनेसाठी मोबाईलवरूनही अर्ज करता येणार आहे. यापूर्वी केवळ संगणकावरून किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारे अर्ज करणे शक्य होते, मात्र आता महाडीबीटी पोर्टलला मोबाईल-फ्रेंडली इंटरफेस मिळाल्याने घरबसल्या मोबाईलवरून अर्ज करता येतो. शेतीतील औषध फवारणीसाठी खर्च व कष्ट कमी करून स्वच्छ व अक्षय ऊर्जा वापरास प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
सौर फवारणी पंपाचे फायदे
डिझेल किंवा पेट्रोलवरील फवारणी पंप खरेदी करणे खर्चिक आहे आणि त्यासाठी नियमित इंधन खर्चही करावा लागतो. मात्र सौर उर्जेवर चालणाऱ्या फवारणी पंपांमुळे इंधनाचा खर्च शून्य होतो, शिवाय पर्यावरणाचीही हानी होत नाही.
Solar Pump Yojana – अर्ज करण्यासाठीची पात्रता आणि अटी
अर्जदार महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी असावा.
शेतकऱ्याकडे Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) असणे आवश्यक आहे.
लाभ प्रक्रिया “प्रथम अर्ज, प्रथम लाभ” या तत्वावर आधारित आहे, म्हणजेच लॉटरी नसून प्रथम अर्ज करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाईल.
मोबाईलवरून अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया
- मोबाईलमधील Google Chrome किंवा तुम्ही जे वापरत असाल ते ब्राउझर ओपन करा.
- mahadbt farmer login असे सर्च करा आणि AgriLogin – Maha DBT लिंकवर क्लिक करा.
- वेबसाइट स्क्रोल करून सूचना वाचून ‘OK’ करा.
- तुमचा Farmer ID टाका. माहित नसल्यास आधार क्रमांक टाकून OTP द्वारे तो मिळवता येतो.
- OTP टाकून लॉगिन करा.
- लॉगिननंतर “घटकासाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
- कृषी यांत्रिकीकरण > कृषी यंत्र अवजार खरेदीसाठी अर्थसहाय्य > मनुष्यचलित औजारे > पिक संरक्षण औजारे > सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप निवडा.
- सर्व पर्याय भरून ‘जतन करा’, नंतर ‘अर्ज सादर करा’ वर क्लिक करा.
- अर्ज फी ₹23.60 ऑनलाईन पेमेंट करा (QR कोड वापरणे सोपे).
- अर्जाची पावती प्रिंट किंवा PDF मध्ये सेव्ह करून ठेवा.
आवश्यक कागदपत्रे
शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID)
आधार कार्ड
बँक पासबुक
सात-बारा उतारा (अर्ज करताना नाही, पण लाभ घेताना आवश्यक असू शकतो)
हेही वाचा : पती-पत्नीस मिळणार दरमहा 10,000 रुपये पेन्शन! जाणून घ्या संपूर्ण माहिती.