LIC Bima Sakhi Yojana: महिलांना घरबसल्या पैसे कमावण्याची संधी + डेवलपमेंट ऑफिसर बनण्याचीही संधी!

2 Min Read
LIC Bima Sakhi Yojana 2025 Details

LIC Bima Sakhi Yojana : ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील घरात राहून स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या किंवा उत्पन्नाचे साधन शोधत असणाऱ्या महिलांसाठी एक खास योजना सुरू करण्यात आली आहे. त्या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकत भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने महिलांसाठी बीमा सखी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश महिलांना प्रशिक्षण देऊन LIC एजंट बनवणे आणि महिलांना घरबसल्या कमाईची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

नेमकी काय आहे LIC Bima Sakhi Yojana?

बीमा सखी योजना सरकार आणि LIC यांचा संयुक्त उपक्रम आहे. बीमा सखी योजनेसाठी निवड झालेल्या महिलांना विमा एजंट म्हणून काम करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिल जात. यामध्ये विमा विक्री, ग्राहक संवाद, आर्थिक साक्षरता यासारख्या महत्त्वाच्या बाबी शिकवल्या जातात.

बीमा सखी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांना बीमा सखी सर्टिफिकेट आणि LIC एजंट कोड दिला जातो. म्हणजेच प्रशिक्षण झाल्यानंतर महिला अधिकृतपणे LIC साठी एजंट म्हणून काम करू शकतात.

किती होणार कमाई?

प्रशिक्षणादरम्यान महिलांना दरमहा ₹5,000 ते ₹7,000 स्टायपेंड दिल जात.

प्रशिक्षणानंतर कमीशन आणि इन्सेंटिव्हच्या माध्यमातून उत्पन्न मिळते.

एका वर्षात ₹48,000 पर्यंतची अतिरिक्त कमाई होऊ शकते.

जर महिलेने विकलेल्या पॉलिसीपैकी 65% पॉलिसी दुसऱ्या वर्षीही सुरू राहिल्या, तर 3 वर्षांपर्यंत स्टायपेंड चालू राहू शकतो.

या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात?

अर्ज फक्त महिलांसाठी खुला आहे.

महिलेचे वय 18 ते 70 वर्षांदरम्यान असावे.

किमान शैक्षणिक पात्रता 10वी पास.

LIC एजंट, कर्मचारी किंवा त्यांच्या जवळचे नातेवाईक या योजनेसाठी पात्र नसतील.

अर्ज प्रक्रिया कशी आहे?

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेबसाइट:

licindia.in 

ऑफलाइन अर्ज:

तुमच्या जवळच्या LIC शाखेत, CSC केंद्रात किंवा पंचायत कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो.

अर्ज करताना ओळखपत्र, वयाचा दाखला, शैक्षणिक कागदपत्र, बँक डिटेल्स आणि पासपोर्ट साईझ फोटो आवश्यक आहेत.

डेवलपमेंट ऑफिसर बनण्याची संधी!

या योजनेअंतर्गत महिलांना फक्त एजंट म्हणून काम करण्याचीच संधी मिळत नाही, तर महिलांना 3 वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर LIC डेवलपमेंट ऑफिसर होण्याचीही संधी मिळू शकते. ही योजना महिलांसाठी केवळ उत्पन्नाच साधन नसून, दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबनाच प्रवेशद्वार आहे.

हेही वाचा : 10वी पास तरुणांसाठी मोठी भरती सुरू! दरमहा ₹1,12,400 पगार.

Share This Article