Ladki Bahin Yojana Zero Interest Loan : लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थीं महिलांना सरकारकडून दरमहा १५०० रुपये मिळतातच, पण आता त्याचबरोबर राज्य सरकारकडून महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तेही शून्य टक्के व्याजदराने. या निर्णयामुळे लहान उद्योग, स्वयंरोजगार आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण याला मोठी चालना मिळणार आहे.
0% व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज – Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी राज्य सरकारकडून आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आता मुंबई बँकेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी शून्य टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. लाडक्या बहिणींसाठी सुरु करण्यात आलेल्या या कर्ज योजनेअंतर्गत महिला एकट्या किंवा गटामध्ये (5 ते 10 महिला) एकत्रित मिळून स्वतःचा कोणताही व्यवसाय सुरू करू शकतात.
कर्जाची मर्यादा 1 लाख रुपये असून या कर्जावर कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. अर्ज सादर केल्यानंतर व्यवसायाची शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर लगेच कर्ज मंजूर केले जाईल.
यामुळे लाडकी बहीण योजनेतून आता महिलांना दरमहा फक्त १५०० रुपयांची आर्थिक मदतच नव्हे, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी आणि आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळणार आहे. राज्य सरकारने केलेली ही घोषणा “लाडकी बहिण” योजनेला खर्या अर्थाने आत्मनिर्भरतेकडे नेणारी आहे.