Ladki Bahin Yojana Loan: लाडक्या बहिणींना मिळणार ४०,००० रुपयांच कर्ज, अजित पवार यांची मोठी घोषणा

2 Min Read
Ladki Bahin Yojana Loan Announced Maharashtra

Ladki Bahin Yojana Loan Announced Maharashtra : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आतापर्यंत फक्त दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळत होती. पण आता ही योजना महिलांसाठी केवळ मासिक मदतीपुरती मर्यादित राहणार नाही, तर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी सरकारकडून कर्ज दिल जाणार आहे.

नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घोषणा केली की, लाडकी बहिण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना आता ४०,००० रुपयांपर्यंत कर्ज दिल जाईल. या कर्जाचा वापर महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी करू शकतील. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने एक मोठ पाऊल मानल जात आहे.

कर्ज कस मिळेल आणि कोण पात्र?

महिलांना संबंधित बँकेत जाऊन लोनसाठी अर्ज करावा लागेल.
अर्ज करताना महिलांना व्यवसायाची माहिती द्यावी लागेल.
महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या मासिक मदतीतूनच कर्जाची परतफेड (EMI) करून घेतली जाईल, म्हणजेच महिलांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही.

Ladki Bahin Yojana Loan Eligibility – कर्जासाठी पात्रतेच्या अटी

  1. महिला अर्जदाराच वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असाव.
  2. अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  3. महिलेच वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असाव.
  4. कुटुंबातील कुणीही सरकारी नोकरीत नसाव, आणि कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसाव.
  5. महिलेला लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त इतर कोणत्याही सरकारी योजनेतून थेट आर्थिक मदत मिळत नसावी.

लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हफ्ता कधी मिळणार?

लाडकी बहिण योजनेच्या १२व्या हप्त्याबाबत महिलांना उत्सुकता आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी सांगितले की, जून महिन्याचा हप्ता लवकरच डीबीटी (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार याच आठवड्याच्या आत हप्त्याचे पैसे खात्यात येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Free Silai Machine Yojana 2025: महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; कुठे करायचा अर्ज?.

Share This Article