Free Tablet Yojana 2025 Fact Check : मागील काही दिवसांत सोशल मीडियावर आणि काही वेबसाइट्सवर एक बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे — Free Tablet Yojana 2025 या नावाने केंद्र सरकारकडून मोफत टॅबलेट वाटप होणार असल्याचा दावा केला जात आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज लिंकही शेअर केली जात आहे.
या बातमीमुळे अनेक पालक, शिक्षक आणि विद्यार्थी संभ्रमित झाले आहेत. पण या योजनेमागे नेमक सत्य काय आहे? आणि ही योजना खरच अस्तित्वात आहे का? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
Free Tablet Yojana 2025 – नेमकी काय आहे ही योजना?
या योजनेची सखोल चौकशी केली असता, भारत सरकारच्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटवर (जस की https://www.india.gov.in/, https://www.education.gov.in/, किंवा राज्य शिक्षण मंडळाच्या) वेबसाईट वर अशा कोणत्याही फ्री टॅबलेट योजनेचा उल्लेख नाही. तसेच, Digital India, PM eVidya, Samagra Shiksha या मोठ्या डिजिटल शिक्षण योजनांमध्ये सुद्धा अशा टॅबलेट वाटप योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
फसव्या वेबसाईट्स आणि लिंकपासून सावध!
वास्तविक, या योजनेच्या नावाने काही वेबसाइट्स आणि WhatsApp/Telegram वर बनावट फॉर्म्स शेयर केले जात आहेत, जे फसवणुकीचा भाग असू शकतात. काही ठिकाणी “Free Tablet Yojana 2025 Apply Now” लिंकवर क्लिक करताच, युजरकडून Aadhaar, बँक डिटेल्स, फोटो अशी माहिती मागितली जात आहे. या माहितीचा गैरवापर केला जाण्याचा धोका आहे.
Free Tablet Yojana 2025 – सरकारच स्पष्टीकरण
PIB Fact Check या अधिकृत सरकारी ट्विटर हँडलवरूनही यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आल आहे की, “Free Tablet Yojana” नावाने कोणतीही केंद्र सरकारची योजना अस्तित्वात नाही. कोणतीही सरकारी योजना सुरु झाली, तर ती फक्त अधिकृत सरकारी संकेतस्थळांवरूनच जाहीर केली जाते.
सध्या “Free Tablet Yojana 2025” ही योजना खोटी आहे. यासंदर्भात कोणताही अधिकृत GR किंवा आदेश उपलब्ध नाही. अशा कोणत्याही भ्रामक योजनेवर विश्वास ठेवू नये आणि आपल्या वैयक्तिक माहितीची काळजी घ्यावी.
हेही वाचा : Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025: बांधकाम मजुरांच्या मुलांना मोफत लॅपटॉपच आश्वासन… पण कितपत खर?.