Free Silai Machine Yojana 2025: महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; कुठे करायचा अर्ज?

2 Min Read
Free Silai Machine Yojana 2025 Fact Check

Free Silai Machine Yojana 2025 Fact Check : मोफत शिलाई मशीन योजना या नावाने सध्या सोशल मीडियावर, WhatsApp ग्रुप्समध्ये आणि काही वेबसाईट्सवर दावा केला जात आहे कि — सरकारकडून महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे असा आहे, आणि त्यासाठी काही अटींसह अर्ज प्रक्रिया सांगितली जात आहे.

या माहितीमुळे अनेक महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. काहीजणींनी कागदपत्रांची तयारी देखील सुरू केली आहे. मात्र, या सगळ्यामागच सत्य काय आहे, हे समजून घेण आवश्यक आहे.

Free Silai Machine Yojana 2025 – ही योजना खरच आहे का?

तपासणीअंती समजते की, Free Silai Machine Yojana या नावाने सध्या कोणतीही सरकारी योजना सुरू नाहीये. केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही अधिकृत पोर्टलवर अशा योजनेचा उल्लेख नाही. PIB (Press Information Bureau) कडूनही या योजनेबद्दल “ही योजना खोटी आहे” असा खुलासा यापूर्वीच करण्यात आलेला आहे.

का आणि कशा पसरतात अशा अफवा?

अशा ‘फ्री’ योजनेच्या बातम्या मुख्यतः WhatsApp, Facebook आणि काही वेबसाईट्सवरून पसरवल्या जातात.
महिलांमध्ये आशा निर्माण करून, त्यांच्याकडून KYC, बँक तपशील, किंवा ओटीपी मागून फसवणूक केली जाते.

सरकारने काय म्हटल आहे?

PIB Fact Check च्या माहितीनुसार, मोफत शिलाई मशीन योजना सध्या कुठल्याही अधिकृत स्वरूपात अस्तित्वात नाही. सरकारने नागरिकांना अशा अफवा पसरवणाऱ्या वेबसाईट्सपासून सावध राहण्याच आवाहन केल आहे.

वाचकांसाठी महत्त्वाचा सल्ला

अशा कोणत्याही योजनेबाबत माहिती मिळाल्यास, केवळ सरकारी वेबसाईट्स जसे कि india.gov.in, aaplesarkar.mahaonline.gov.in किंवा pib.gov.in यावरच खात्री करा.
कोणतीही वैयक्तिक माहिती (आधार, OTP, बँक डिटेल्स) अनोळखी फॉर्म किंवा लिंकवर शेअर करू नका.
फसवणुकीबाबत शंका असल्यास, सर्वात आधी जवळच्या CSC केंद्राशी किंवा पंचायत कार्यालयाशी संपर्क करा.

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अनेक चांगल्या योजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत – मात्र Free Silai Machine Yojana 2025 ही फक्त अफवा असून, सध्या अशा कोणत्याही योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : शेतकऱ्यांना मिळणार दर महिन्याला 3,000 रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Share This Article