Download E Aadhaar Online: फक्त 3 सोप्या स्टेप्स मध्ये मोबाईलवरून डाउनलोड करा ई-आधार

2 Min Read
Download E Aadhaar Online

Download E Aadhaar Online : भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाच कागदपत्र आहे. बँकेत खाते उघडायच असो, एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा निमसरकारी काम असो, आधार कार्डची गरज सर्वत्र भासतेच. पण जर तुमच मूळ आधार कार्ड हरवल किंवा तुमच्या जवळ नसेल, तर काय कराल? यासाठीच यूआयडीएआय (UIDAI) ने ई-आधार कार्ड म्हणजेच डिजिटल आधारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ई-आधार म्हणजे काय?

ई-आधार हे आधार कार्डाचच डिजिटल स्वरूप आहे, ज्यामध्ये तुमच नाव, जन्मतारीख, पत्ता, फोटो, आणि QR कोडसह संपूर्ण माहिती असते. हे आधार कार्ड प्रमाणेच पूर्णपणे वैध असून सरकारी व खासगी संस्थांमध्ये स्वीकारले जाते. विशेष गोष्ट म्हणजे, ई-आधार कार्ड तुम्ही कुठूनही, कधीही मोफत डाउनलोड करू शकता.

ई-आधार कस डाउनलोड करायच? (एकदम सोप्या स्टेप्स)

स्टेप 1: UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा

ब्राउझरवर https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar/en ओपन करा.

स्टेप 2: माहिती भरा

“आधार नंबर” पर्याय निवडा.
तुमचा 12 अंकी आधार नंबर टाका.
स्क्रीनवर दाखवलेला कॅप्चा कोड भरा.
“Send OTP” या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3: OTP Verify आणि डाउनलोड

तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
तो OTP भरून “Verify & Download” बटनवर क्लिक करा.
काही सेकंदातच तुमच ई-आधार PDF स्वरूपात डाउनलोड होईल.

टीप: डाउनलोड झालेल PDF पासवर्ड प्रोटेक्टेड असत. पासवर्ड म्हणजे तुमच्या नावातील पहिले चार कॅपिटल अक्षर + जन्माच्या वर्षातील चार आकडे.
उदा: जर तुमच नाव असेल – SAGAR, आणि जन्मवर्ष असेल – 1988 → तर तुमचा पासवर्ड असेल: SAGA1988

ई-आधारची गरज कधी भासते?

बँकेच्या KYC साठी
सरकारी योजनांसाठी (PM Kisan, PMAY, इ.)
मोबाईल सिम खरेदी करताना
शाळा, कॉलेज प्रवेशासाठी
पॅन कार्ड लिंक करण्यासाठी

ई-आधार हे मूळ आधारइतकच अधिकृत आहे. त्यामुळे ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा. गरजेच्या वेळी कधीही तुम्ही त्याचा वापर करू शकता.

हेही वाचा : असा करा सौरचालित फवारणी पंप मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज.

Share This Article