Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025: बांधकाम मजुरांच्या मुलांना मोफत लॅपटॉपच आश्वासन… पण कितपत खर?

2 Min Read
Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025 Fact Check

Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025 Fact Check : सध्या WhatsApp, Facebook, YouTube अशा अनेक ठिकाणी एकच बातमी मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे – “बांधकाम मजुरांच्या 10वी-12वी उत्तीर्ण मुलांना बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत मोफत लॅपटॉप दिला जातोय!” या बातमीमुळे बांधकाम क्षेत्रात काम करणारे अनेक पालक आणि त्यांची मूले उत्साही झाले आहेत.

योजनेचा तपशील दिला जातोय, अर्जाची तारीख, पात्रता, अर्ज प्रक्रिया, mahabocw.in वेबसाईटचा उल्लेखही… पण हा संपूर्ण प्रकार नेमका किती विश्वासार्ह आहे?

फॅक्ट चेक: Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025 खरंच अस्तित्वात आहे का?

महाराष्ट्र बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ (mahabocw) ही बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवते, जसे की शिक्षण शिष्यवृत्ती, अपघात विमा, वैद्यकीय मदत इ. मात्र, सध्या “मोफत लॅपटॉप योजना” नावाची कोणतीही योजना मंडळाच्या अधिकृत यादीत नाही.

mahabocw.in या अधिकृत वेबसाइटवर अशा कोणत्याही लॅपटॉप योजनेचा उल्लेख नाही.
शासनाच्या GR (शासन निर्णय), अधिकृत जाहिरात किंवा प्रसिद्धीपत्रकातही ही योजना अस्तित्वात नाही.
ही योजना PIB (Press Information Bureau) कडून याआधीही “फेक” म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे.

फसवणुकीची शक्यता — सावध राहा!

अनेकदा अशी माहिती तयार करून लोकांकडून वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक, बँक तपशील गोळा केला जातो. अशा बनावट अर्ज लिंकवर क्लिक करू नका. या माध्यमातून तुमच्याशी डिजिटल फ्रॉड होऊ शकतो.

खऱ्या बांधकाम कामगार योजनांची माहिती कुठे मिळेल?

mahabocw.in – महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पोर्टल
जवळच जिल्हा बांधकाम कामगार कार्यालय
CSC केंद्र किंवा पंचायत कार्यालय
https://pib.gov.in – फॅक्ट चेकसाठी

निष्कर्ष: लॅपटॉप मिळणार नाही?

सध्या तरी “Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025” ही योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे या नावाने चालणारे अर्ज, फॉर्म, लिंक, वेबसाईट्स यावर कोणत्याही प्रकारची माहिती भरू नका.

हेही वाचा : महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; कुठे करायचा अर्ज?.

Share This Article