Atal Pension Yojana: पती-पत्नीस मिळणार दरमहा 10,000 रुपये पेन्शन! जाणून घ्या संपूर्ण माहिती

2 Min Read
Atal Pension Yojana Husband Wife 10000 Monthly Benefit

Atal Pension Yojana Husband Wife 10000 Monthly Benefit : नोकरी करणाऱ्या सामान्य कुटुंबातील व्यक्तींनी निवृत्तीनंतरच्या जीवनाचा जर आजच विचार केला नाही, तर उद्याच आर्थिक संकट टाळण कठीण होऊ शकत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 2015 मध्ये अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) सुरू केली आहे. ही योजना आज देशभरातील कोट्यवधी लोकांमध्ये लोकप्रिय ठरली असून, या योजनेत दरमहाअतिशय कमी गुंतवणुक करून निश्चित पेन्शन मिळवता येते.

पती-पत्नी दोघांनाही मिळणार दरमहा 5-5 हजार रुपये पेन्शन

जर पती-पत्नी दोघांनीही अटल पेन्शन योजनेत स्वतंत्रपणे नोंदणी केली आणि ठराविक वयापासून या योजनेत दरमहा निश्चित गुंतवणूक केली, तर दोघांनाही निवृत्तीनंतर म्हणजेच वयाच्या 60 वर्षानंतर दोघांनाही दरमहा 5,000 रुपये, म्हणजेच एकूण 10,000 रुपये पेन्शन मिळू शकते. आणि ही पेन्शन आयुष्यभर दिली जाते.

अटल पेन्शन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात?

वय: 18 ते 40 वर्षांदरम्यान
पेन्शन मिळणे सुरू: वयाच्या 60 वर्षानंतर
आवश्यक कागदपत्रे: पॅन कार्ड, आधार कार्ड

जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरु केली, तर तुम्हाला या योजनेत दरमहा केवळ 210 रुपये भरावे लागतील, जे वयाच्या 60 वर्षापर्यंत भरावे लागतील. त्यानंतर तुम्हाला नियमितपणे दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळेल.

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या बँकेला भेट देऊन अटल पेन्शन योजनेत खाते उघडू शकता. अनेक बँकानी आता ऑनलाइन फॉर्मची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. खात सुरु करताना तुमच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असण आवश्यक आहे.

ही योजना का निवडावी?

निवृत्तीनंतर निश्चित मासिक उत्पन्न
अल्प गुंतवणुकीत दीर्घकालीन लाभ
पतिपत्नी दोघांसाठी स्वतंत्र खाते आणि दरमहा पेन्शन
सरकारची हमी असलेली पेन्शन योजना

हेही वाचा : 15 दिवसांत थेट घरपोच मिळणार नवीन मतदार ओळखपत्र; असा करा अर्ज.

Share This Article