Government Job: 10वी पाससाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पोस्टल लाइफ इन्श्युरन्समध्ये भरती सुरू, वॉक-इन मुलाखत 1 जुलै रोजी

2 Min Read
Postal Life Insurance Recruitment 10th Pass Government Job

Postal Life Insurance Recruitment 10th Pass Government Job : सरकारी नोकरी शोधणाऱ्या 10वी पास उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाअंतर्गत ‘पोस्टल लाइफ इन्श्युरन्स’मध्ये थेट मुलाखतीद्वारे अभिकर्ता पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा न घेता फक्त मुलाखतीच्या आधारे 10वी पास उमेदवारांची निवड होणार आहे. या भरतीमुळे मुंबईत सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी मिळाली आहे.

Postal Life Insurance Recruitment 2025 साठी कोण अर्ज करू शकतो?

पोस्टल लाइफ इन्श्युरन्स भरती साठी अर्ज करणारा उमेदवार केंद्र किंवा राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारास विमा क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास तो अनुभव अतिरिक्त फायदेशीर ठरणार आहे.

वयोमर्यादा

किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 50 वर्षे

18 वर्षे ते 50 वर्षे वयोगटातील कोणताही उमेदवार अर्ज करू शकतो.

मुलाखतीची तारीख व वेळ

मुलाखत: 1 जुलै 2025
स्थळ: उपनिदेशक, टपाल जीवन विमा विभाग, मुख्य कार्यालय, मुंबई – 400001

मुलाखतीला जाताना काय काय सोबत घेऊन जावे?

10वी च शैक्षणिक प्रमाणपत्र
पॅन कार्ड
आधार कार्ड
पासपोर्ट साइज फोटो
अनुभवाचे प्रमाणपत्र (असल्यास)

उमेदवारांनी सर्व कागदपत्रांची मूळ प्रत आणि झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन मुलाखतीला उपस्थित राहणे गरजेचे आहे.

पगार आणि नोकरीचे ठिकाण

या पदासाठी निवड झाल्यास उमेदवाराला चांगल्या पगारासोबत मुंबई शहरात सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. ही भरती पोस्टल लाइफ इन्श्युरन्सच्या अंतर्गत असून, केंद्र सरकारच्या संरक्षणाखाली काम करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

Share This Article