Maharashtra Farmer: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता थेट WhatsApp वर मिळणार ही महत्वाची कागदपत्र

2 Min Read
Maharashtra 7 12 Ferfar 8a On Whatsapp

Maharashtra 7 12 Ferfar 8a On Whatsapp : महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आता सातबारा (7/12), फेरफार आणि 8अ चे उतारे कुठेही न जाता घरबसल्या थेट मोबाईलवर (WhatsApp वर) मिळणार आहेत. ही सेवा 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या नोंदीसाठी तलाठी कार्यालयात किंवा संगणक केंद्रांवर धावपळ करण्याची गरज राहणार नाही. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होणार असून, WhatsApp सारख्या सहज उपलब्ध माध्यमाचा वापर करून सरकारी कागदपत्रे मिळवणे अधिक सोपे होणार आहे.

WhatsApp वर कशी मिळणार कागदपत्र?

  1. महसूल विभाग लवकरच एक अधिकृत WhatsApp नंबर जाहीर करणार आहे.
  2. शेतकऱ्यांना फक्त त्या नंबरवर “Hi” असा मेसेज पाठवायचा आहे.
  3. त्यानंतर एक इंटरॅक्टिव्ह मेनू मिळेल ज्यामधून सातबारा, फेरफार, 8अ उतारा असे पर्याय निवडता येतील.
  4. आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा गट नंबर टाकून जमीन शोधता येईल.
  5. आवश्यक त्या कागदपत्रांची PDF कॉपी थेट WhatsApp वर मिळेल.

कोणकोणती कागदपत्र मिळणार?

7/12 उतारा (सातबारा)
फेरफार उतारा
8अ उतारा (मालमत्ता नोंद)
नकाशा
उत्पन्नाचा दाखला (पुढील टप्प्यात)

शेतकऱ्यांना काय फायदा?

वेळ आणि पैसे वाचणार – केंद्रावर जाण्याची गरज नाही
फसवणुकीस आळा – अधिकृत WhatsApp सेवा
कागदपत्र तत्काळ मिळणार – डिजिटल साक्षांकित कॉपी
कृषी कर्ज व अनुदानासाठी सहज उपयोग

राज्य सरकारचा उद्देश

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले की, “शासनाच्या ‘डिजिटल महाराष्ट्र’ या उपक्रमाचा हा एक भाग आहे. शेतकऱ्यांना पारदर्शक आणि जलद सेवा मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे.”

येत्या काळात आणखी सुविधा

7 12 Online: महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात या WhatsApp सेवा प्रणालीत e-mutation request, online complaint filing, आणि भूमी अभिलेख सत्यापन यासारख्या अनेक सेवा समाविष्ट केल्या जाणार आहेत.

हेही वाचा : 20वा हप्ता कधी जमा होणार? यादीत तुमच नाव आहे का? लगेच चेक करा.

Share This Article