10th Pass Govt Job: 10वी पास तरुणांसाठी मोठी भरती सुरू! दरमहा ₹1,12,400 पगार

2 Min Read
Mazagon Dock Shipbuilders Recruitment 2025

10th Pass Govt Job | Mazagon Dock Shipbuilders Recruitment 2025 : फक्त दहावी पास आणि ITI केलेल्या तरुणांसाठी केंद्र सरकारच्या मालकीच्या प्रतिष्ठित संस्थेत नोकरीची जबरदस्त संधी निर्माण झाली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited) या सरकारी कंपनीत ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना 30 जून 2025 पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mazagon Dock Shipbuilders Recruitment साठी कोण अर्ज करू शकतो?

ही भरती भारतीय नौदल, जहाजबांधणी, उत्पादन व यांत्रिकी क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक योग्य व्यासपीठ आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण केलेली असावी
संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र अनिवार्य
वयोमर्यादा: कमाल 21 वर्षे, मात्र अनुसूचित जाती-जमातींसाठी सवलत लागू

किती मिळेल पगार?

निवड झालेल्या उमेदवारांना मिळणारे वेतन ₹35,400 ते ₹1,12,400 दरमहा असेल.
या व्यतिरिक्त केंद्र शासनाच्या नियमानुसार भत्ते व सुविधा देखील लागू होतील.

निवड प्रक्रिया कशी असेल?

ही भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे:

  1. संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा
  2. कागदपत्र पडताळणी
  3. वैद्यकीय चाचणी

ऑनलाइन परीक्षेतील गुणवत्ता आणि आरक्षण निकषांनुसार उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाईल.

अर्ज कसा करायचा?

अधिकृत वेबसाइट www.mazagondock.in या वेबसाईटला भेट द्या
‘Recruitment’ टॅबमध्ये ‘Mazagon Dock Shipbuilders Bharti 2024’ लिंकवर क्लिक करा
अर्जात वैयक्तिक, शैक्षणिक व संपर्क माहिती काळजीपूर्वक भरा
आवश्यक कागदपत्रे (10वीची गुणपत्रिका, ITI प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्षरी) अपलोड करा
अर्ज सादर करून प्रिंट काढून सुरक्षित ठेवा

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 जून 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि ITI केल असेल, तर माझगाव डॉकसारख्या प्रतिष्ठित संस्थेत नोकरीची ही सुवर्णसंधी गमावू नका. केवळ सरकारी नोकरी नव्हे तर प्रशिक्षण, भत्ते आणि करिअरची दार उघडणारी ही प्रक्रिया तुमच भविष्य उज्वल करू शकते.

हेही वाचा : 10वी पाससाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पोस्टल लाइफ इन्श्युरन्समध्ये भरती सुरू, वॉक-इन मुलाखत 1 जुलै रोजी.

Share This Article