PM Kisan Yojana 20th Installment Status Check : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपत आली आहे. PM Kisan योजनेसाठी पात्र असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, तो म्हणजे – “पिएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी जमा होणार?”
PM Kisan योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले जातात. हफ्त्याची रक्कम दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 19 हप्ते वितरित करण्यात आले असून, 20वा हप्ता येत्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
PM Kisan Yojana 20वा हप्ता कधी जमा होणार?
सामान्यतः पिएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यांमध्ये सुमारे चार महिन्याचे अंतर असते. योजनेचा मागील (19वा) हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जमा झाला होता, त्यामुळे यंदाचा 20वा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर, तुम्हाला 20 व्या हप्त्याचे पैसे मिळतील की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमचे पिएम किसान योजना स्टेटस तपासणे गरजेचे आहे.
तुमच नाव पिएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत आहे कि नाही? अस चेक करा स्टेटस:
- सर्वात आधी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- होमपेजवर असणाऱ्या “Know Your Status” या पर्यायावर क्लिक करा
- तुमचा PM Kisan रजिस्ट्रेशन नंबर टाका नंबर माहित नसेल तर “Know Your Registration No.” वर क्लिक करून नंबर शोधू शकता
- नंतर दिलेला कॅप्चा कोड टाका आणि Get OTP वर क्लिक करा
- तुमच्या मोबाइलवर आलेला OTP भरा आणि Get Details वर क्लिक करा
- यानंतर तुमच नाव लाभार्थी यादीत आहे का, हप्ता मंजूर झाला आहे का, याची संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल
तुम्हाला हप्ता न मिळण्याची कारण काय असू शकतात?
जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केलेली नसेल
तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल
भू-सत्यापन अद्याप प्रक्रियेत असेल
जर तुम्ही फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरली असेल
पिएम किसान योजनेच्या माध्यमातून सध्या देशातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे.
हेही वाचा : रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची सूचना.