Gharkul Yojana Beneficiary List Maharashtra Online Check: घरकुल योजनेसाठी अर्ज केलाय आणि पैसे मिळण्याची अजूनही वाट पाहत आहात? खाली सांगितलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरकुल योजनेच्या यादीत (Gharkul Yojana List) तुमच नाव सहज चेक करू शकता…
स्वतःच घर असण हे प्रत्येकाच स्वप्न असत. पण आर्थिक अडचणीमुळे अनेकांना स्वताच घर बांधण्याच स्वप्न पूर्ण करता येत नाही. अशाच गरजू कुटुंबांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने घरकुल योजना सुरु केली आहे. ही योजना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे आजपर्यंत हजारो कुटुंबांना स्वताच पक्क घर बांधण्यास मदत मिळाली आहे.
जर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमच नाव लाभार्थी यादीत आल आहे कि नाही हे तुम्हाला माहित नसेल तर, आता ही माहिती तपासण अगदी सोप झाल आहे. कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता, तुम्ही घरकुल योजनेची यादी तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता, तेही अवघ्या काही मिनिटांत!
घरकुल योजना यादी कशी तपासायची?
घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत तुमच नाव आल आहे कि नाही हे तपासण्यासाठी सरकारने आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे तुम्ही घरबसल्या यादीत तुमच नाव आहे कि नाही ते तपासू शकता.
खाली सांगितलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरकुल योजना यादीत तुमच नाव सहज तपासू शकता:
- मोबाईल ब्राऊजरवर खालीलपैकी कोणतीही एक वेबसाईट ओपन करा: https://pmayg.nic.in
https://pmaymis.gov.in - मुख्य पृष्ठावर असणाऱ्या “AwaasSoft” या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर “Reports” विभागात जाऊन “Social Audit Reports” हा पर्याय निवडा.
- आता “Beneficiary Details for Verification” या पर्यायावर क्लिक करा.
- एक नवीन विंडो उघडेल, जिथे तुम्हाला राज्य, जिल्हा, तालुका, गाव, योजना वर्ष (उदा. 2023-24), योजना प्रकार – PMAY-G अशी माहिती भरावी लागेल.
- Captcha कोड भरून “Submit” किंवा “Get Report” वर क्लिक करा.
- तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर दिसेल. त्यात तुमच नाव, घर मंजुरी क्रमांक, सध्याची स्थिती (उदा. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, पूर्ण) अशी सर्व माहिती तुम्हाला दिसेल.
घरकुल योजनेचे फायदे आणि महत्त्व
राज्यातील अनेक कुटुंबांकडे आजही स्वतःचे घर नाही किंवा ते असुरक्षित घरांमध्ये राहतात. अशा कुटुंबासाठी घरकुल योजना आधार बनली आहे. घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी तीन टप्प्यांत खालीलप्रमाणे आर्थिक मदत दिली जाते:
पहिला टप्पा – जमीन उपलब्ध असल्यास मंजूरी.
दुसरा टप्पा – बांधकाम सुरू झाल्यानंतर.
तिसरा टप्पा – बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अंतिम रक्कम.
घरकुल योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामपंचायत, राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करत आहेत.
जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल आणि अजूनही पैसे मिळण्याची वाट बघत असाल, तर आजच वरील प्रक्रियेद्वारे लाभार्थी यादीत तुमच नाव आहे का हे तपासा. आणि जर अजूनही तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर आजच अर्ज करा.
हेही वाचा : मोफत पीठ गिरणी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी ही महत्वाची माहिती वाचाच!.