Mofat Pithachi Girni Yojana Maharashtra: मोफत पीठ गिरणी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी ही महत्वाची माहिती वाचाच!

3 Min Read
Mofat Pithachi Girni Yojana Maharashtra Fact Check

Mofat Pithachi Girni Yojana Maharashtra Fact Check : अलीकडच्या काही दिवसांत सोशल मीडियावर आणि काही वेबसाईट्सवर एक मोठ्या प्रमाणावर शेअर होणारी बातमी दिसून आली — “महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार, त्यासाठी अर्ज सुरु!” अशा आकर्षक मथळ्याखाली महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी मिळवण्याची सुवर्णंसंधी असल्याचा दावा केला जात आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला या योजनेविषयी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, काहींनी तर अर्ज देखील भरले आहेत.

पण खर तर मोफत पीठ गिरणी (Mofat Pith Girni Yojana) योजनेविषयी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा कोणत्याही सरकारी खात्याच्या GR मध्ये कोणतीही स्पष्ट माहिती आढळून आली नाही. ही योजना केंद्र किंवा राज्य सरकारच्या अधिकृत अनुदान योजनांच्या यादीत सुद्धा कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे या योजनेबाबत प्रश्न निर्माण होतो — ही योजना खरी आहे का?

Mofat Pith Girni Yojana – अर्जाचे गूढ आणि दिशाभूल

मोफत पीठ गिरणी योजनेसाठी अर्ज Google Form किंवा इतर खासगी वेबसाइट्सवर मागवले जात आहेत. अर्ज करताना आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला अशी वैयक्तिक माहिती मागितली जात आहे. पण ही माहिती कोण गोळा करतय, कोणत्या सरकारी यंत्रणेसोबत त्याचा संबध आहे, हे स्पष्टपणे कुठेही सांगितल जात नाही.

हेच या योजनेच्या संशयास्पद स्वरूपाच मुख्य लक्षण आहे — कारण कोणतीही सरकारी योजना ही https://mahadbt.maharashtra.gov.in किंवा https://india.gov.in यासारख्या अधिकृत पोर्टलवरूनच राबवली जाते. आणि तशी माहिती किंवा योजनेचा अधिकृत GR कोणत्याही खात्याच्या वेबसाइटवर सध्या उपलब्ध नाही.

फसवणूक टाळण्यासाठी काय कराव?

खर पाहिल तर, अनेक वेळा “मोफत शिलाई मशीन योजना”, “महिलांसाठी बिनव्याजी कर्ज योजना”, “स्वतःचा व्यवसाय सुरू करा” अशा नावाखाली सरकारी योजनांच्या नावाने नागरिकांची फसवणूक होताना दिसते. अशा योजनेच्या नावाने नागरिकांकडून ओटीपी, बँक डिटेल्स किंवा पैसे मागण्याचे प्रकार देखील घडले आहेत. त्यामुळे अशी कोणतीही नवीन योजना सोशल मीडियावर पाहिल्यास आधी तिची पडताळणी करा.

अर्ज करण्यापूर्वी mahadbt.maharashtra.gov.in, pib.gov.in, किंवा संबंधित विभागाचा GR तपासा.
कोणतीही माहिती, लिंक किंवा अर्ज Google Form मधून मागितला जात असेल, तर लगेच सावध व्हा.
फॉर्म भरताना ओटीपी, आधार क्रमांक, बँक खाते डिटेल्स ही माहिती देऊ नका.

मोफत पीठ गिरणी योजना सध्या तरी महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही अधिकृत योजनांमध्ये अस्तित्वात नाही. त्यामुळे ही योजना सध्या “व्हायरल पण अविश्वसनीय” या श्रेणीत मोडते. नागरिकांनी अशा योजनांपासून सावध राहाव आणि योग्य ती खातरजमा करूनच कोणत्याही योजनेसाठी अर्ज करावा.

हेही वाचा : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! या तारखेला खात्यात जमा होणार जूनचा हप्ता.

Share This Article