लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! या तारखेला खात्यात जमा होणार जूनचा हप्ता Ladki Bahin Yojana June 2025 Installment

2 Min Read
Ladki Bahin Yojana June 2025 Installment Update

Ladki Bahin Yojana June 2025 Installment Update : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक दिलासादायक अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार याबाबत लाखो महिलांमध्ये उत्सुकता होती. समोर आलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा 12 वा हफ्ता (Ladki Bahin Yojana June Installment) लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हफ्ता कधी मिळणार?

जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 11 हप्ते पात्र लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मे महिन्याचा हप्ता जुन महिन्याच्या सुरुवातीला दिला गेल्यामुळे, महिलांमध्ये आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळेल, याची उत्सुकता वाढली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भात अजूनही सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

जून महिना संपायला अवघे 8 दिवस उरले असून, याच आठवड्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

1500 की 2100? महिलांच्या मनात प्रश्न कायम

विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीकडून लाडक्या बहिणींना 1500 रुपयांच्या हफ्त्याची रक्कम वाढवून हफ्ता 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे जून महिन्यात देखील पात्र महिलांना 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार असल्याच स्पष्ट होतय.

लाडक्या बहिणींसाठी कर्ज योजना (Ladki Bahin Yojana Loan)

मुंबई बँकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 0% व्याजदराने एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच राज्यातील सर्व पात्र महिलांना 40,000 रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देऊन, दिलेल्या कर्जाची परतफेड महिलांना दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयातून करून घेण्याबाबतची बँकांसोबत बोलणी सुरु असल्याच अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितल आहे.

हेही वाचा : लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज तेही 0% व्याजदराने.

Share This Article