Solar Pump Helpline: सौर कृषी पंप धारक शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी सुविधा; हेल्पलाईन नंबर व विशेष पोर्टल सुरु

2 Min Read
Solar Pump Yojana Helpline Maharashtra MSEDCL

Solar Pump Yojana Helpline Maharashtra MSEDCL : राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपांचा लाभ घेतला असून, त्यातील तांत्रिक अडचणींवर तत्काळ उपाय मिळावा यासाठी वीज वितरण कंपनीने विशेष पावल उचलली आहेत. मुसळधार पावसात आणि वादळी वाऱ्यांमुळे सौर पंपांची नुकसान भरपाई, तांत्रिक दुरुस्ती किंवा सेवा यासाठी आता अधिकृत हेल्पलाईन आणि पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) ने शेतकऱ्यांसाठी 1800-233-3435 आणि 1800-212-3435 हे टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत. यासोबतच शेतकरी mahadiscom.in/solar_MTSKPY या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकणार आहेत. शेतकऱ्यांसाठी ही सेवा पूर्णतः मोफत असून, सौर पंप संबंधित कोणत्याही अडचणींवर ३ दिवसात तांत्रिक सेवा देणे बंधनकारक आहे.

MSEDCL ने जाहीर केले आहे की, शेतकऱ्यांनी सौर पंपा संबंधित तक्रारी नोंदवताना नोंदणीकृत मोबाईल नंबर, लाभार्थी क्रमांक, गाव, तालुका आणि जिल्हा याबद्दलची योग्य माहिती द्यावी. तक्रारी सोडवण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना SMS द्वारे पुष्टी संदेश मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत बसवले गेलेले सर्व सौर पंप विमाधारित असून, चोरी, तांत्रिक बिघाड यासारख्या घटनांवर भरपाईसाठी शेतकऱ्यांना आता इतर ठिकाणी फिराव लागू नये यासाठी पुरवठादार कंपन्यांनी प्रत्येक जिल्ह्यात सेवा केंद्र स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

MSEDCL ने शेतकऱ्यांना या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. “या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि त्रास वाचणार असून, सौर पंपांची देखभाल अधिक सुलभ होईल.”

हेही वाचा : फळपीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळपीक विमा योजनेसाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ.

Share This Article