Farmers Pension: शेतकऱ्यांना मिळणार दर महिन्याला 3,000 रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

2 Min Read
PM Kisan Maandhan Yojana Farmers Monthly Pension Apply

PM Kisan Maandhan Yojana Farmers Monthly Pension Apply : शासकीय नोकरी करणारे असोत वा खासगी नोकरी त्यांना निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळते त्यामुळे वृद्धापकाळात त्यांना आर्थिक मदत मिळते. पण रोज शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांना वृद्धापकाळात मात्र आर्थिक अडचणणींना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक खास योजना सुरु केली आहे. ज्यातून शेतकरी सुद्धा दर महिन्याला निश्चित पेन्शन मिळवू शकतात. त्या योजनेबद्दल जाणून घेऊयात…

शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळातील आर्थिक अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक खास पेन्शन योजना सुरू केली आहे. पिएम किसान मानधन योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा आधार मिळावा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळातील गरजा भागवता येतील.

देशभरातील लाखो लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार दरमहा 3,000 रुपये पेन्शन देते.

PM Kisan Maandhan Yojana – कोण पात्र आहेत?

PM Kisan Maandhan योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी पात्र आहेत. अर्ज करताना शेतकऱ्याला आपली जमीन नोंदणी, आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागते. महत्वाची बाब म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.

किती भरावा लागतो हप्ता?

18 वर्षे वयात या योजनेत सहभागी झाल्यास दरमहा फक्त 55 रुपये भरावे लागतात.
40 वर्षे वयात योजनेत सहभागी झाल्यास दरमहा 200 रुपयांपर्यंतचा हप्ता भरावा लागतो.

हा मासिक हप्ता वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत नियमित भरावा लागतो. आणि वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला पेन्शन मिळणे सुरु होते. 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळते. जर लाभार्थीचा मृत्यू झाला, तर त्याच्या पत्नीला दरमहा 1,500 रुपये पेन्शन दिली जाते.

अर्ज कसा करायचा?

जवळच्या CSC (Common Service Centre) मध्ये जा.
आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील (IFSC कोडसह), जमिनीचे दस्तऐवज व मोबाईल नंबर सोबत घ्या.

अधिक माहितीसाठी केंद्र सरकारच्या अधिकृत maandhan.in पोर्टलला भेट द्या.

हेही वाचा : महिलांना घरबसल्या पैसे कमावण्याची संधी + डेवलपमेंट ऑफिसर बनण्याचीही संधी!.

Share This Article